बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2022
- 522
कामगार नेते महेंद्र घरत यांचा मानस
उरण ः रोजगार युवा मंच उरण यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै 2022 रोजी रत्नेश्वरी सभागृह जसखार येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. यामध्ये 200 ते 250 तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. यापैकी 27 बेरोजगारांना विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल असेल यावेळी महेंद्र घरत यांनी सांगितले.
सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच ज्यांना नोकरी लागली आहे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी 25 नोव्हेंबर 2022 रोजी आनंदी हॉटेल उरण येथे रोजगार आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उरण मधील बेरोजगार तरुण-तरुणी यांच्यासाठी मी व युवा रोजगार मंच प्रामाणिकपणे काम करून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम करणार आहोत. जास्तीत जास्त बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai