40 खेळाडूंना मिळणार मोफत क्रिकेट प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2025
- 294
सचिन तेंडुलकर क्रिकेट ॲकेडमीमार्फत नमुंमपा विद्यार्थ्यांना संधी
नवी मुंबई ः मुलांमधील अंगभूत कौशल्ये ओळखून त्यांना योग्य वयात संधी उपलब्ध करुन देण्याची भूमिका जपत असून मुलांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे काम करीत असल्याबद्दल महानगरपालिका, शिक्षक व पालकांची प्रशंसा करीत जगप्रसिध्द क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. डि वाय पाटील स्टेडिअम येथे असलेल्या सचिन तेंडुलकर क्रिकेट ॲकेडमीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना शास्त्रशुध्द क्रिकेट प्रशिक्षण मिळावे यादृष्टीने ॲकेडमीच्या पुढाकाराने देण्यात येत असलेल्या क्रिकेट प्रशिक्षणाच्या यावषच्या शुभारंभप्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी उपस्थित शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, डॉ. डि वाय पाटील स्टेडिअमचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. यावेळी सुसंवाद साधतांना सचिन तेंडुलकर यांनी लहानपणीच्या क्रिकेट खेळाच्या आठवणी सांगितल्या. यश मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे मुलांच्या पाठीशी उभे राहता त्याप्रमाणेच अपयशाच्या काळातही खंबीरपणे सोबत रहा असे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अशा प्रकारची शास्त्रशुध्द क्रिकेट प्रशिक्षणाची मोठी संधी पालिकेच्या विद्यार्थ्यांना ॲकेडमीच्या वतीने विनामूल्य उपलब्ध करुन देत असल्याबद्दल भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे आभार व्यक्त करीत ते जपत असलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल गौरवोद्गार काढले.
सचिन तेंडुलकर क्रिकेट ॲकेडमीचे मुख्य प्रशिक्षक अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ॲकेडमीच्या निवड समितीने तीन दिवसांचे शिबीर राबवून महापालिकेच्या शाळांतील 1100 हून अधिक विद्यार्थ्यांच्या क्रिकेट खेळाची चाचणी घेत त्यामधून 240 मुलांची अंतिम चाचणीसाठी निवड केली. डॉ. डि वाय पाटील स्टेडिअम येथे त्या मुलांचा काही वेळ खेळ बघत सचिन तेंडुलकर यांनी मुलांशीही संवाद साधला. त्यामधील 20 मुले व 20 मुली यांची निवड करण्यात येऊन त्यांना वर्षभर विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मुलांना क्रिकेट किटही ॲकेडमीमार्फतच देण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षण शुल्क घेतले जाणार नाही. यापूव सन 2022 पासून निवड चाचणी मधून निवड झालेल्या 20 मुलांपैकी 13 मुले व 9 मुलींपैकी 3 मुली ॲकडमीमध्ये नियमीत प्रशिक्षणासाठी जात आहेत. ही सर्व मुले आता वरील वयोगटात गेलेली असल्याने या वष पुन्हा 15 वर्षाआतील मुलामुलींची निवड चाचणी घेऊन त्यामधून 20 मुले व 20 मुलींची निवड करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai