Breaking News
मुंबई ः माहीम दर्गा बांधकाम प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची मदत घेऊन हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली आहे. गुढी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर आज कारवाई करण्यात आली.
मुंबईतील गुढी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता आणि कारवाईसाठी महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर रात्रीच जिल्हा प्रशासन जागे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीच्या तोडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने तोडक कारवाईसाठी महापालिकेची मदत घेतली.
दरम्यान, समुद्राच्या आतील भागात बांधकाम असल्याने हे अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मुंबई महापालिका कायद्यानुसार समुद्राच्या किनाऱ्याच्या आतमध्ये दहा मीटर अंतर जरी असल्यास मुंबई महापालिकेची हद्द किनाऱ्यापलगतच असल्याने अशी कारवाई करता येत नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबई जिल्हाधिकारी यांच्या हद्दीत या संदर्भात कारवाईचे अधिकार आहेत, असे पालिकेडून सांगण्यात आले. मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील, असे सांगण्यात आले. मात्र, त्याआधीच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर सकाळी मेरिटाईन बोर्ड अधिकाऱ्यांनी पाहाणी करत पुढील कारवाई केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai