कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 05, 2024
- 792
पनवेल-चिपळूण आणि रत्नागिरी-पनवेल गाड्या धावणार
नवी मुंबई : कोकणवासियांसाठी रेल्वेच्या मोजक्याच गाड्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे विशेष मेमू सुरु करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी कोकण रेल्वेने पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरी-पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 31 मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूने दोन मेमू गाड्या धावणार आहेत.
पनवेल-रत्नागिरी (01157) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी 4 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी रात्री 8:25 वाजता पनवेल स्थानकातून सुटेल. तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहचेल. ही मेमू विशेष गाडी सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा,कोलाड,इंदापूर,माणगाव,गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे,करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रूक,खेड, अंजनी, चिपळून, सार्वेडा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्टेशन येथे थांबेल.
तसेच चिपळूण-पनवेल (01158) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी 4 फेब्रुवारी ते 31 मार्च यादरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी 15:25 वाजता चिपळूण स्थानकातून सुटेल. ती त्याच दिवशी रात्री 8:15 वाजता पनवेल स्थानकात पोहचेल. ही मेमू विशेष गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रूक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai