शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सलुजा सुतार भाजपात
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 29, 2025
- 100
नवी मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष सलोजा सुतार यांनी गणेश नाईक यांना साथ देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुक नामनिर्देशन पत्र भरण्याला एक दिवस बाकी असताना सलुजा सुतार यांनी भाजपला साथ दिल्याने नवी मुंबईत गणेश नाईक यांचे पारडे जड झाले आहे. तर महत्वाच्या पदावरील नेतृत्वाने ऐनवेळी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मात्र धक्का बसला आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांचा धुरळा उडाला असला तरी अद्याप युती आणि आघाडीच्या जागवाटपाचे घोडे अनेक ठिकाणी अडले आहे. काही ठिकाणी भाजप-शिंदेसेनेला युतीचा मुहूर्तच सापडलेला नाही. 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असताना नवी मुंबईत पक्षांतराचे जोरदार वारे सुरुच आहे. आज उबाठा उपनेते विठ्ठल मोरे यांच्या भाजापात पक्षप्रवेशाप्रमाणेत बेलापुर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष सलोजा सुतार यांनीही घड्याळाची साथ सोडून कमळाला प्राधान्य दिले आहे. सलुजा सुतार यांच्या उपस्थितीतत नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या होत्या. सलुजा सुतार या शरद पवार यांच्या अंत्यत विश्वासू मानल्या जात होत्या. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी पक्षांतर केल्याने रा.श.प. गटाला मोठा धक्क्का बसला आहे.
निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी उबाठा व शरद पवार पक्षातील दिग्गज नेत्यांनी गणेश नाईक यांना साथ दिल्याने नाईकांचे पारडे जड झाले आहे. जागावाटप झाले नसल्याने आणि पक्षांतर सुरुच असल्याने युती आणि आघाडी होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai