महिला सक्षमीकरणाकडे महापालिकेचे पाऊल
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 19, 2025
- 116
20 हजार महिलांना दोन दिवसीय जागृती प्रशिक्षण
पनवेल ः महापालिका क्षेत्रातील महिलांना स्वावलंबी व सशक्त बनवण्यासाठी, व्यवसायिक व सामाजिक कौशल्य वाढविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिलांना विविध लघुउद्योग आणि कौशल्यविकास विषयक प्रशिक्षणाबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली चारही प्रभागातील सुमारे 20 हजार महिलांना दोन दिवसीय जागृती प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महिलांना स्वावलंबी, सबळ बनविणे तसेच त्यांचा व्यावसायिक आणि सामाजिक सक्षमीकरण साधण्यासाठी पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षण आणि जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना आरोग्य, रोजगार, व्यवसाय, कायदे, तंत्रज्ञान आणि सामाजिक हक्कांविषयी माहिती देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
या उपक्रमांतर्गत विविध विषयांवर आधारित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
1. आरोग्यविषयक जनजागृती
महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी मासिक पाळी स्वच्छता, मानसिक आरोग्य, कॅन्सरविषयक जनजागृती तसेच आधुनिक आरोग्य साधनांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
2. योग, ध्यानधारणा आणि प्राणायाम
योगाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम, ध्यानाचे फायदे तसेच प्राणायामाचे व्यावहारिक प्रात्यक्षिक महिलांना दिले जाणार आहे.
3. असंघटित महिलांसाठी उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन
नवी मुंबई विमानतळ, एमआयडीसी, जेएनपीटी, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील रोजगार संधी, ऑनलाइन व्यवसाय, डिजिटल बँकिंग, गुंतवणूक पर्याय, तसेच घरातून सुरू करता येणारे व्यवसाय या विषयांवर प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
4. वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण
स्व-ओळख, संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, वेळ व्यवस्थापन, आत्मविश्वास वाढविणे, इव्हेंट मॅनेजमेंट, योग्यता विकास अशा विषयांचा समावेश यात करण्यात आला आहे.
5. कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रशिक्षण
कार्बन फुटप्रिंट कमी करणे, ओल्या-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण, घरगुती कंपोस्ट तयार करणे आणि पुनर्वापराचे महत्त्व याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
6. कायदे विषयक जागृती व शासकीय योजना माहिती
महिलांसाठीचे कायदे, हुंडाबंदी, स्त्री-भ्रूणहत्या प्रतिबंध, ‘पनवेल कनेक्ट ॲटप’चा वापर, शासकीय योजना आणि वेबसाइटवरून अर्ज प्रक्रिया अशा विषयांबाबत माहिती दिली जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai