5 उद्यानांमध्ये सोलार ट्री प्रकल्प
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2025
- 106
पनवेल ः पनवेल महापालिकेला माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळाल्यानंतर प्राप्त झालेल्या बक्षीस रक्कमेतून शहरातील विविध प्रभागांमधील पाच उद्यानांमध्ये नाविन्यपुर्ण अशा सोलार ट्री उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून, ऊर्जा बचत, स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण जनजागृती यांना मोठा हातभार लागणार आहे.
डीपीआर मध्ये प्रस्तावित केलेल्या कामाअंतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रातील अ” प्रभाग - खारघर से-20, प्लॉट 21, नावडे उपविभाग (तळोजा) सेक्टर 14, प्लॉट 92, ब“ प्रभाग - कळंबोली से-6ए, प्लॉट, क” प्रभाग - कामोठे से-5, प्लॉट 45, ड” प्रभाग - पनवेल, नवीन पनवेल से-16, प्लॉट 3 अशा 5 विविध ठिकाणी सौर-ट्री ची स्थापना करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पनवेल महापालिकेने प्रभावी पावले उचलली आहेत. यामध्ये धूळ नियंत्रण, हवेची गुणवत्ता तपासणी आणि शुद्धीकरणासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करून शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ हवा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये 4 फॉग कॅनन वाहने, याशिवाय, एअर मॉनिटरिंग व्हॅन च्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील हवेची गुणवत्ता नियमितपणे मोजली जाते. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी 5 एअर प्युरिफिकेशन सिस्टीम्स बसविण्यात आलेल्या असून लवकरच अजून 5 ठिकाणी या सिस्टीम बसविण्यात येणार आहेत. महापालिकेच्या या उपक्रमामुळे सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळणार असून, नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक संदेशही पोहोचणार आहे. पुढील काळात अशाच आणखी पर्यावरणपूरक प्रकल्पांना गती देण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे पनवेल मनपा उपायुक्त स्वरुप खारगे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai