बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढले
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 24
सोनम वांगचूकना जबरदस्तीने उचलून सफदरजंग रुग्णालयात नेले
नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर मंतर येथे 21 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी जबरदस्तीने उचलून सफदरजंग रुग्णालयात नेले. आंदोलकांनी पोलिसांना विरोध केल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी बळजबरीने त्यांनाही हाकलून देण्यास सुरुवात केली आहे.
सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनी जंतर-मंतर इथे ही कारवाई केली. प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे, हे लक्षात घेऊन, न्यायालयानं यापूर्वीच सोनम वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचं, तसेच त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख ठेवून त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले होते. वांगचुक यांच्यासोबत, आयसाचे विद्यार्थी नेहा, अमीन आणि मनीष हे गेल्या 21 दिवसांपासून जंतर मंतर येथे उपोषणावर आहेत. त्यांचे उपोषण अजूनही सुरू आहे. तीव्र हायपोग्लायसेमियामुळे नेहाला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तर अमीन आणि मनीष यांची प्रकृतीही खालावत आहे.
सलग 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती सतत खालावत होती, वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री एक व्हिडीओ मेसेज जारी केलेला. या व्हिडीओद्वारे, वांगचुक यांनी 20 जुलै रोजी नियोजित असलेल्या चलो संसद (संसदेकडे कूच) रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यांनी म्हटलं की, जर कांद्याच्या दरांबाबत सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकतं, तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता यांबाबतही सरकारची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे. नीट परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये केला आणि या मुद्द्यावर सरकारनं उत्तर दिलंच पाहिजे, असं ठामपणे सांगितलं.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai