भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 03, 2026
- 93
नवी मुंबई : राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत भाजपने बिनविरोध उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले आहे. त्यामध्ये, कल्याण डोंबिवलीतून भाजपने खातं खोलल्यानंतर आता ठाणे, भिवंडी, अहिल्यानगर आणि आता पनवेल महापालिकेतही मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध केले आहेत. पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून पनवेल महापालिका निवडणुकासाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे, भाजपचे 6 उमेदवार तर एक अपक्ष बिनविरोध निवडून आले आहेत.
भाजपचे नितीन पाटील सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाले आहेत. नितीन पाटील यांची प्रभाग क्रमांक- 18 (ब) मधून हि निवड झाले होते. येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा छाननी प्रक्रियेत अर्ज बाद झाल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. परिणामी पनवेल महापालिकेसाठी मतदानापूर्वीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला. त्यानंतर, शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांचे अर्ज माघारी घेतल्याने एकूण 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे, पनवेल महापालिकेत महायुतीचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. येथील शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने भाजपचा विजयी मार्ग सुकर झाला आहे.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
- नितीन पाटील
- रुचिता लोंढे
- अजय बहिरा
- दर्शना भोईर
- प्रियंका कांडपिळे
- ममता प्रितम म्हात्रे
- स्नेहल ढमाले - अपक्ष
- पनवेलमध्ये भाजपची सत्ता
पनवेल महापालिकेवर 2017 साली भाजपची एक हाती सत्ता आली होती. 78 नगरसेविकांपैकी 51 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते. यंदा शिवसेना शिंदे गटासोबत भाजपची युती आहे, मागील निवडणुकीत शिवसेनेला इथे खातंही खोलता आले नाही, परंतु यावेळी युती झाल्याने दोन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवणार असल्याचे भाजप आमदार प्रशात ठाकूर यांनी सांगत पुन्हा भाजपचा महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. - राजकीय गणित?
पनवेलचे राजकीय समीकरण हे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या भोवती फिरत आहे, ठाकूर कुटूंबीय शेकाप पक्षात असताना शेकापची सत्ता होती, कॉग्रेस पक्षात असताना पनवेलमध्ये कॉग्रेसची सत्ता होती, भाजपमध्ये असताना भाजपची सत्ता आहे. भाजपने स्ट्राँग विरोधी पक्ष ठेवला नसल्याने भाजपची सत्ता पुन्हा पनवेल महापालिकवर फडकेल असं मत विश्लेषक सांगत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai