नवीन चार कामगार कायदे लागू
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 175
वेतन प्रणाली, सुरक्षा नियम आणि रोजगार संरचनांमध्ये मोठे बदल
मुंबई ः केंद्र सरकारने शुक्रवारी देशात नवीन श्रम संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील कामगारांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात नवीन कामगार संहिता अर्थात लेबर कोड लागू करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी अखेर केंद्र सरकारने नवीन कामगार संहिता लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशातील कामगार कायदे, वेतन प्रणाली, सुरक्षा नियम आणि रोजगार संरचना यांमध्ये मोठे बदल घडणार आहेत.
केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून चार प्रमुख श्रम संहितांचा अंमलबजावणी सुरू केली आहे. लागू केलेल्या नवीन कामगार संहितांमध्ये वेतन संहिता (2019), औद्योगिक संबंध संहिता (2020), सामाजिक सुरक्षा संहिता (2020) आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता (2020) या संहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1930 ते 1950 च्या दशकात तयार केलेले कायदे आता कालबाह्य झाले होते.या संहितांमुळे यापूर्वी अस्तित्वात असलेले 29 विविध श्रम कायदे एकत्रित व सुलभ करण्यात आले आहेत.
नव्या संहितांमुळे कामगारांसाठी अनेक नवीन हक्क व सुविधा अंमलात येणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) दिली आहे. आता नवीन संहितेमुळे तब्बल 40 कोटी कामगारांना सुरक्षा कवच देण्यासह सर्व कामगारांना वेळेवर आणि किमान वेतनाची हमी देण्यात आली असल्याचे मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं की, ही सुधारणा केवळ एक बदल नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय आहे. या नवीन कामगार सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहेत आणि विकसित भारत 2047 च्या ध्येयाला नवीन चालना देतील.
केंद्र सरकारच्या मते, या चार श्रम संहितांमुळे भारतातील श्रमव्यवस्थेचे आधुनिकीकरण, पारदर्शकता आणि रोजगार सुरक्षा या तिन्ही बाजूंना एकाच वेळी बळ मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय भारताच्या आर्थिक रचनेवर दीर्घकालीन परिणाम करणारा ठरेल.
- पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?
माझ्या कामगार बंधू आणि भगिनींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आमच्या सरकारने चार कामगार संहिता लागू केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर कामगारांच्या हितासाठी हा सर्वात मोठा निर्णय आहे. यामुळे देशातील कामगारांना मोठ्या प्रमाणात सक्षमता मिळेल. तसेच यामुळेव्यवसाय सुलभतेला देखील चालना मिळेल. काम करणाऱ्या बंधू आणि भगिनींसाठी सामाजिक सुरक्षा, वेळेवर वेतन आणि सुरक्षित कार्यस्थळ सुनिश्चित करण्यासाठी या संहिता महत्वाच्या ठरतील. माता, बहिणी आणि तरुणांना त्यांचा विशेषतः फायदा होईल. या सुधारणांमुळे एक मजबूत परिसंस्था निर्माण होईल जी भविष्यात आपल्या कामगारांच्या हक्कांचे रक्षण करेल आणि भारताच्या आर्थिक विकासाला नवीन चालना देईल. यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच, त्याशिवाय उत्पादकताही वाढेल. विकसित भारताकडे आपला प्रवासही वेगवान होईल असंही मोदींनी म्हटलं आहे
कामगारांसाठी महत्त्वाच्या सुधारणा
- ठराविक कार्यकालानंतर ग्रीच्युटी मिळण्याचे नियम बदलले आहेत. यापूर्वी 5 वर्षे लागायची होती आता 1 वर्षानंतर मिळू शकते.
- आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी वेतन प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- महिला कर्मचाऱ्यांसाठी रात्री काम करण्याच्या अटी व सुरक्षिततेचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत.
- प्लेटफॉर्म व गिग कामगारयांना सामाजिक संरक्षणाचा विस्तार मिळणार आहे.
- सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी
- तरुणांसाठी नियुक्ती पत्रांची हमी
- 40 कोटी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा हमी
- 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक मोफत आरोग्य तपासणीची हमी
- ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतनाची हमी
- धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी 100 टक्के आरोग्य सुरक्षेची हमी
- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कामगारांसाठी सामाजिक न्यायाची हमी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai