शिरवणेत माजी विद्यार्थ्यांची अनोखी गुरुपौर्णिमा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 66
गुरुवर्य यशवंत बारक्या भोईर यांचा भावपूर्ण सत्कार
नवी मुंबई : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत शिरवणे गावातील 1977-78 च्या इयत्ता सातवीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी आपले गुरुवर्य यशवंत बारक्या भोईर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार केला. अनेक दशकांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेला स्नेह, आदर आणि ऋणानुबंध यांचे अनोखे दर्शन या कार्यक्रमातून घडविले.
शिरवणे गावातील प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी 48 वर्षानंतर गुरुंच्या भेटीसाठी एकत्र येऊन गुरु-शिष्य नात्याचा अविस्मरणीय सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले गुरु यशवंत बारक्या भोईर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला. जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी गुरुंच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. गुरुवर्य भोईर यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भारावून जात त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात गुरु-शिष्य नात्याची जपणूक, शिक्षणातून मिळालेले संस्कार आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यावरही उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. अनेक वर्षांनंतर झालेल्या या स्नेहमेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा मैत्रीचे आणि आपुलकीचे बंध अधिक दृढ झाले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी अजित पवार, राजन भोईर, नरेश भोईर यांच्यासह सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला असून, गुरुंच्या ऋणाची जाणीव जपणारा आणि भावी पिढीसाठी प्रेरणादायी असा हा उपक्रम असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. हा सोहळा यशस्वी होण्यास अजित पवार, नामदेव पाटील व राजन भोईर सह इतर अनेक विद्यार्थ्यांनी मोलाचा हातभार लावला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai