नवी मुंबईत काका-दादा एकत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 29, 2025
- 114
उबाठा उपनेते विठ्ठल मोरेंचा गणेश नाईकांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
नवी मुंबई : महापालिकांचे बिगुल वाजल्यापासून सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. तसेच उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी तारेवरची कसरत करुन इतर पक्षात उड्या मारल्या आहेत. नवी मुंबईतही उबाठा आणि काँग्रेसमधून भाजप व शिंदेसेनेमध्ये जाणाऱ्यांची रिघ लागली असून नवी मुंबईतून ठाकरे गट नेस्तनाबूत होण्याच्या वाटेवर आहे. आजच उबाठाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी गणेश नाईक यांना साथ देत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे नवी मुंबईत काकांनी ‘दादा मला वाचवा’ अशी हाक देऊन ठाकरेंना धक्का देत राजकारणात खळबळ उडवली आहे.
नवी मुंबईची निवडणुक एकत्र लढणार की युती करुन यावर अद्याप एकमत झालेले नाही. तत्पुर्वीच उबाठा व काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम करत भाजप व शिंदेसेनेला जवळ केलेआहे. दोन आठवड्यापुर्वी उबाठाचे ऐरोलीतील मुख्य नेते एम.के.मढवी यांनी कुटुंबासह व बेलापुरमधून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुनम पाटील यांनीही पतीसह शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले शिवसेना उ.बा.ठा. गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी आज सोमवारी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा मुलगा अवधूत हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. अवधूत हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना निवडणुकीत धुळ चारणार असे म्हणणाऱ्या ठाकरेंच्या उपनेते पदावर असलेल्या मोरे यांनी स्वतःच शेवटच्याक्षणी मशाल सोडून कमळ हाती घेतल्याने ठाकरेसेनेतील शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.
ऐरोली, घणसोली बेलापूर, वाशी, कोपरखैरणे आणि नेरुळसह संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबईत, भाजप आणि शिवसेना/(शिंदे) यांच्या 28 पॅनलमधील 111 नगरसेवक जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत, ज्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. जर युती झाली नाही, तर उद्या आणखी लोक वेगवेगळ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात उमेदवारी अर्ज दाखल करणे थांबवण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai