मोरबे धरणातील पाणीसाठा 77.84%
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 35
नवी मुंबई : यंदा पावसाने ओढ दिल्याने मोरबे धरणातील पाणीसाठी 8 टक्क्यांवर गेला होता. परिणामी उरलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र आता सतत पडलेल्या पावसाने धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाली असून तो 77.84 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
एल निनोचा प्रभाव आणि मान्सूनचे उशीरा आगमन यामुळे धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला. पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच उन्हाळा व पाणीउपसा यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात जवळपास 8 टक्केच जलसाठा शिल्लक असल्याचे चित्र होते. त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून पाणीकपात सुरू केली होती. गेल्यावर्षी 20 ऑगस्ट रोजी धरण 100 टक्के भरले होते.
मोरबे धरणात सध्या 77.84 टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत धरणक्षेत्रात 2214 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाही ऑगस्ट महिन्यात धरण भरावे अशी अपेक्षा नागरिक व प्रशासन व्यक्त करत आहे. यंदा धरण भरण्यासाठी साधारणतः एकूण 3800 मिमी पावसाची आवश्यकता आहे. धरणात 13 मार्च 2027 पर्यंत पाणीपुरवठा करता येईल एवढा पाणीसाठा झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai