Breaking News
पनवेल ः पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धुळखात पडलेल्या सोनोग्राफी मशीन आता रुग्णांच्या सेवेस पुन्हा सज्ज झाले आहेत. कारण रुग्णालयाला रेडिओलॉजिस्ट डॉक्टर मिळाले आहेत. परिणामी, गोरगरीब गरजू रुग्णांना आता येथेच सुविधा उपलब्ध होणार आहे. वारंवार पाठपुरावा केल्यामुळे उशिरा का होईना आरोग्य विभागाला जाग आली असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नव्याने उभारण्यात आलेली इमारत प्रशस्त असली तरी या ठिकाणी अनेक वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दोन सोनोग्राफी मशीन गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडून होत्या. रेडिओलॉजिस्ट नसल्याने रुग्णांना बाहेर जाऊन सोनोग्राफी करावी लागत होती. खाजगी सेंटरवर मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत होते. परिणामी गरीब गरजूंना मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता. विशेष करून गरोदर महिलांची ससहोलपट होत असे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन ऑपरेट करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर मिळावा या अनुषंगाने वारंवार मागणी होत होती. वारंवार तगादा लावल्यामुळे शेवटी रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध झाले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai