Breaking News
उरण ः आत्ताचा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीने उरण तालुक्यात घवघवीत यश मिळवून तिनही ग्रामपंचायतींवर इंडिया आघाडीचे सरपंच विराजमान झाले आहेत. दिघोडे ग्रामपंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे किर्तीनिधी ठाकूर हे विजयी होऊन 17 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारला तर उपसरपंच पदी अभिजित पाटील यांची निवड करण्यात आली.
चिरनेर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भास्कर मोकल तर उपसरपंच पदी काँग्रेस पक्षाचे सचिन घबाडी यांची निवड करण्यात आली. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी सर्वांचे अभिनंदन केले व जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचे आवाहन नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांना केले. येणाऱ्या काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीला हा शुभशकून असून परिवर्तन निश्चित आहे इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यावेळी म्हणाले. मिरवणुकीने वाजत गाजत सर्व सरपंच व उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला. यावेळी रा.जि. काँ. क. वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, अल्पसंख्यांक विभागाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अखलाक शिलोत्री तसेच मोठ्या संखेने काँग्रेस व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai