Breaking News
मागण्या पुर्ण करण्याच्या ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाने संप स्थगित
उरण ः महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 5 मार्च 2024 पासून महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीमध्ये बेमुदत आंदोलन चालू होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 9 मार्च 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संयुक्त कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक नागपूर येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
कंत्राटी कामगारांचे प्रश्न हे गहन असून कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर शासन कटिबद्ध आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना पोसता येईल एवढे वेतन मिळाले पाहिजे ही भूमिका सरकारची आहे असे ऊर्जामंत्री फडणवीस म्हणाले. निश्चितच कंत्राटी कामगारांचे योगदान हे वीज कंपन्यांसाठी मोठे असल्यामुळे शासन त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. संयुक्त कृती समितीने दिलेल्या सर्व समस्यांवरती सरकार सकारात्मक विचार करणार आहे असे उर्जा मंत्री यांनी सांगितले आहे. या बैठकीत कंत्राटी कामगारांच्या पत्रातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली आणि हितार्थ अनेक निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले. या सर्व गोष्टी आगामी काळात लवकर झाल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन 5 मार्च पासून सुरू केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai