Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिवसानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन संपन्न झाले. यावेळी राष्ट्रध्वजाला वंदन करीत राष्ट्रगीत आणि तद्नंतर राज्यगीत ध्वनीप्रसारित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महाराष्ट्र दिनासोबतच जागतिक कामगार दिनही असल्याने सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या. कामगारांप्रती बांधिलकी जपत नवी मुंबई महापालिका त्यांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेत असून सुरक्षित स्वच्छता अभियान राबविण्यावर भर दिला जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कामगार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांत उत्तम काम करणाऱ्या कामगारांना सन्मानीत केले जाते. त्यास अनुसरून नवी मुंबई शहराचे स्वच्छतेमधील मानांकन सतत उंचावत ठेवणाऱ्या 12 स्वच्छताकर्मींचा आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या कामगारांच्या योगदानाचा सन्मान करणे हे कामगार दिनाच्या निमित्ताने औचित्यपूर्ण असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. मनोहर पवार, पुजा पोरजी, रोहन म्हात्रे, निलेश सोनवणे, सागर सोनवणे, नमिता भिवे, अनिल कांबळे, संजय पाटील, विमल अहिरे, विशाल शिर्के, सरस्वती कानाले, बंटी राठोड या स्वच्छतामित्र व स्वच्छतासखींना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai