Breaking News
पहिल्या टप्याचे काम 94 टक्के पूर्ण ; तिसरी धावपट्टी बांधण्याचे संकेत
नवी मुंबई : सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना देशातील सर्वाधिक पॅकेज देऊन त्यांचे पुनर्वसन केले. यामुळे पूर्वी ज्या चार गावांनी या विमानतळाला विरोध केला त्या चार गावातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या जमिनीसह घरांचे पुनर्वसन करण्याची मागणी सरकारकडे केल्यामुळे राज्य सरकार या चार गावांतील कुटूंबियांचे पूनर्वसन करुन त्या जागेवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भविष्यातील तिसरी धावपट्टी बांधण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नवी मुंबई येथे दिली.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आ. प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, महेश बालदी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल, गणेश देशमुख, डॉ. राजा दयानिधी व इतर अधिकारी उपस्थित होते. विमानतळ कामाच्या पाहणीनंतर अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनंतर मुख्यमंत्र्यांनी या विमानतळातून पहिले विमान सप्टेंबर अखेरपर्यंत उडणार असे यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या विमानतळाच्या पहिल्या टप्याचे काम 94 टक्के पूर्ण झाले असून दररोज 13 हजार कर्मचारी या विमानतळाचे काम पुर्ण करण्यासाठी दिवसरात्र झटत असल्याने अदानी समुह आणि सिडको महामंडळाने दुप्पट मजूर लावून हे पुढील 80 दिवसात विमानतळाचे काम पुर्ण करावे अशाही सूचना यावेळी अदानी समुहाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या विमानतळ प्रकल्पाचे इंटेरीयरचे काम अंतिम टप्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगभऱातील सर्वच विमानतळांच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळातील प्रवाशांची विमानापर्यंत बॅग पोहचविणारी व्यवस्था ‘बॅग क्लेम सिस्टीम’ विकसित केली जाणार आहे. ही जगातील सर्वाधिक वेगवान व सूरक्षित आणि स्वंयचलित पद्धतीची असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. विमानतळ प्रकल्पातील बोर्डींग पासची यंत्रणा पूर्ण झाल्याने विमानतळ व्यवस्थापनाने यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांना विमानतळातील बोर्डींग पास रंगित तालिम म्हणून काढून दाखविला.
महत्त्वाचे टप्पे:
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai