Breaking News
नवी मुंबई : घणसोली येथील पामबीच मार्गावर घणसोली ते ऐरोली खाडीवर पूल बांधण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या कामाची पाहणी करीत कामाला गती देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सदरचे बांधकाम मे.जे.कुमार एस.एम.सी हे कंत्राटदार करीत असून या कामाचे तांत्रिक सल्लागार मे. आकार अभिनव कंन्सल्टन्ट प्रा.लि.हे आहेत. सदरचे काम इंजीनियरिंग, प्रोक्योरमेंट ॲण्ड कन्स्ट्रक्शन तत्वावर करण्यात येणार आहे. हे काम अत्यंत लोकोपयोगी असून सदरचा पूल हा ऐराली-मुलुंड व कटाई नाका या रस्त्यास जोडण्यात येणार आहे. या कामाकरिता येणाऱ्या खर्चाची 50% रक्कम सिडकोमार्फत देण्यात येणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या/प्रमाणपत्रे घेण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत सदर कामाचे जिओटेक्निकल इन्व्हस्टिगेशन व टेस्ट पाईलचे काम प्रगतीपथावर आहे.
आयुक्तांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करीत कास्टींग करण्यात आलेल्या टेस्ट पाईलची पाहणी केली तसेच कामाची स्थिती जाणून घेतली. या कामाच्या संरचनात्मक बाबींचे प्रूफ चेकींग आयआयटी मुंबई या मान्यताप्राप्त त्रयस्थ संस्थेकडून करून घ्यावेत असे निर्देश दिले. सदर काम विहित कालमर्यादेत पूर्ण करून लोकांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गतीमान कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai