Breaking News
व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला प्रकल्पाचा आढावा
नवी मुंबई ः सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी खारघर तुर्भे टनेल लिंक रोड व खारघर येथील सिडको गृहनिर्माण योजना या प्रकल्पांना दि.29 एप्रिल 2025 रोजी भेट दिली. या दोन्ही प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना काम अधिक वेगाने व ठराविक वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
सिडकोतर्फे उत्तर नवी मुंबईतील तुर्भे ते दक्षिण नवी मुंबईतील खारघर नोडला थेट जोडण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. जुईनगर रेल्वे स्थानकासमोरील शीव-पनवेल द्रुतगती महामार्गापासून ते खारघर येथील सेंट्रल पार्क उद्यानापर्यंत अंदाजे 5.490 कि.मी. लांबीचा हा चार पदरी बोगदा मार्ग प्रस्तावित आहे. या 5.490 कि.मी. लांबीच्या मार्गात 1.763 कि.मी. लांबीच्या बोगद्याचा समावेश असणार आहे. तसेच खारघर, नवी मुंबईतील एक अग्रगण्य निवासी नोड असून, सिडकोच्या सुयोग्य नियोजनामुळे येथे उत्कृष्ट जीवनशैलीचा अनुभव घेता येतो. सुसज्ज गृहनिर्माण प्रकल्पांमुळे हा परिसर दर्जेदार आणि उच्चभ्रू जीवनशैली शोधणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो आहे. या गोष्टी लक्षात घेता सिडकोतर्फे खारघर स्थानकाशेजारी परिवहन केंद्रित गृहनिर्माण योजना हाती घेण्यात आली आहे.
या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल तसेच सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व विशेष प्रकल्प) शीला करुणाकरण, अतिरिक्त मुख्य अभियंता प्रभाकर फुलारी, अधीक्षक अभियंता संतोष ओंभासे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai