Breaking News
नवी मुंबई ः महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राज्यभरात लागू होऊन 28 एप्रिल रोजी 10 वर्षे पूर्ण होत असल्याने या दशकपूतचे औचित्य साधून 28 एप्रिल रोजी ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसहभागावर भर देत विविध उपक्रम राबविण्यात आले.
नवी मुंबई महागरपालिका मुख्यालयात शासन निर्देशानुसार सकाळी 11 वा. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करीत सेवा हक्क दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये एकत्र येत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्यासह सामुहिक शपथ ग्रहण केली. लोकसेवांविषयी व त्या लोकसेवा नागरिकांना पुरविण्यासाठी पालिका राबवित असलेल्या ऑनलाईन प्रणालीसह इतर सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहचण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विशेष पथनाट्याचे सादरीकरण महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी असून त्याचा आरंभ महापालिका मुख्यालयातील कार्यक्रमापासून करण्यात आला. यावेळी उपस्थित महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच या कार्यक्रमात सहभागी नागरिकांनीही पथनाट्यातून दिल्या जाणाऱ्या मनोरंजनातून प्रबोधनात्मक संदेशाची प्रशंसा केली. विविध विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी या पथनाट्यांचे सादरीकरण करून लोकसेवांविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai