Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स येथील डीपीएस शाळेत शिकणाऱ्या 4 वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ 28 एप्रिल रोजी सकाळी पालकांनी शाळेवर धडक देत आक्रोश मोर्चा काढला. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणीही पालकांनी केली आहे.
मोर्च्यात पालक वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना(उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी शाळा प्रशासनाचा निषेध असो, शाळेच्या मुख्याध्यापकांना सहआरोपी करा, मुख्याध्यापकांना अटक करा निलंबन करा, निलंबन करा, अश्या घोषणा पालक व पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांचे गैरवर्तनाबाबत पालकांनी माध्यमांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. हातावर काळया फिती लावून पालक व मनसे पदाधिकारी यांच्याकडून निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनाला राजकीय पाठबळ असल्याने शाळेभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होत
एनआरआय पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे. मात्र, या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणारे शाळेचे मुख्याध्यापक हे सुद्धा तेव्हढेच जबाबदार असून त्यांना सहआरोपी करत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पालकांनी यावेळी करण्यात आली. मुख्याध्यापक हरीशंकर वशिष्ठ यांच्यावर काही वरिष्ठ शिक्षकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच हे मुख्याध्यापक उत्तर प्रदेश मधील बुलंद शहर येथील शाळेत असताना त्यांच्यावर शिक्षक व महिला कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले होते. अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला मुख्याध्यापक म्हणून का नेमले असा प्रश्न ही बऱ्याच पालकांनी उपस्थित केला. हाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना(उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. या घटनेत आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी 24 तासांनंतर करण्यात आल्याने आंदोलक संतापले असून त्यांनी शाळेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, शाळा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये कडक नियम लागू करण्याची मागणीही पालकांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai