Breaking News
पोलीस उपआयुक्तांचे शाळा, महाविद्यालय चालकांना निर्देश
नवी मुंबई : शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संस्था चालकांनी कोणत्या उपायोजना कराव्यात तसेच कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती देण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाशीमध्ये शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक संस्थाचे प्राचार्य-मुख्याध्यापक आणि व्यवस्थापकांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेकरीता शाळा-विद्यालयांमार्फत करण्यात येत असलेल्या उपययोजनांचा आढावा घेतला. तसेच विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व लैंगीक अत्याचाराच्या घटनांना कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शाळा-विद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच लैंगिक शोषणाच्या पार्श्वभुमीवर शाळा महाविद्यालये व संस्था चालकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाची शाळा-विद्यालय व महाविद्यालयाकडुन प्रभावीपणे अमंलबजावणी होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी परिमंडळ-1 चे पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी सोमवारी सायंकाळी वाशी सेक्टर-6 मधील मराठी सहीत्य संस्कृती आणि कला मंडळ सभागृहात परिमंडळ -1 मधील 10 पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असलेल्या शाळा-महाविद्यालय शैक्षणिक संस्थाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या आढावा बैठकीमध्ये पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी महाराष्ट्र शासनाव्दारे विदयार्थ्यांच्या सुरक्षितते करिता करावायचे उपाययोजनांबाबतच्या परिपत्रकाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या. तसेच विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेकरीता शाळा-महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थानी थर्ड पाट ऑडीट करुन स्थानिक पोलीस ठाण्यास कळविणेबाबत सूचना केल्या. तसेच विदयार्थ्याच्या सुरक्षितेकरीता व लैंगीक अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरीता सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शालेय व्यवस्थापन कमिटी व स्थानिक पोलीस ठाणे यांनी आपसात समन्वय ठेवुन महाराष्ट्र शासनाव्दारे वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करावी, अशा सुचना केल्या.
या बैठकीकरीता नवी मुंबईतील परिमंडळ 1 मधील 149 शाळा-महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, व्यवस्थापक उपस्थीत होते. या बैठकीला वाशी व तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच परिमंडळ-1 अंतर्गत असलेल्या 10 पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai