Breaking News
नवी मुंबई ः मोरबे मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी ब्रीजजवळ रेल्वे ट्रॅकलगत व चिखले गावाजवळील ब्रीजखाली जलवाहिनी वारंवार गळती होत असल्याने, सदर ठिकाणची जलवाहिनी बदलण्याच्या दुसऱ्या टप्यातील काम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बुधवार दि.14 मे 2025 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणी पुरवठा बुधवार, दि.14 मे 2025 रोजी, दुपारी 12.00 ते गुरुवार, दि.15 मे 2025 रोजी, दुपारी 12.00 वाजेपर्यंत 24 तासांकरिता बंद राहणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांमध्ये बुधवार, दि.14 मे 2025 रोजी संध्याकाळी आणि गुरुवार, दि. 15 मे 2025 रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावयाची आहे. तसेच गुरुवार, दि.15 मे 2025 रोजी संध्याकाळी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होईल.
बुधवार दि.14 मे 2025 रोजी, दुपारी 12.00 ते गुरुवार दि.15 मे 2025 रोजी, दुपारी 12.00 वाजेपर्यंत 24 तासांकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai