Breaking News
नवी मुंबई ः 26 मे रोजी कोसळलेल्या धुवांधार पावसामध्ये प्रामुख्याने बेलापूर विभागात 25 ते 26 मे रोजी या 24 तासात 71.80 मि.मी. आणि 26 व 27 मे 24 तासात 142.02 मि.मी. इतक्या मोठया प्रमाणावरील पावसात 5.17 मी. इतका मोठ्या प्रमाणावरील उधाण भरती कालावधीत अतिवृष्टीचा जोर असल्याने सेक्टर 4, 5, 6, 11 येथील सखल भागात बराच काळ पाणी साचून राहिले. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने संपूर्ण रात्रभर सेक्टर 12 येथील पंपींग हाऊसच्या ठिकाणी अतिरिक्त पंप लावून पाणी उपसा करण्यात आला. पाण्याला खाडीच्या दिशेने मोकळी वाट करुन देण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर भागात अग्निशमन विभागाकडील पाणी उपसापंप कार्यान्वित करुन साचलेले पाणी उचलून पाईपव्दारे खाडीत टाकण्याची कार्यवाही करण्यात आली.
रस्त्यावर साचलेले पाणी निचरा झाल्यानंतर रस्त्यावर साचलेला गाळ उचलून घेण्यासाठी अतिरिक्त वाहने लावण्यात आली व जेटींग मशीनव्दारे रस्ते धुवून घेण्यात आले. यासाठी मलप्रक्रिया केंद्रातील शुध्दीकरण करण्यात आलेल्या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात आला. त्यासोबतच बेलापूरसह सर्वच विभागांमध्ये रस्त्यांवरुन वाहून जाणा-या पाण्याला अडथळा होऊ नये या दृष्टीने वॉटरएन्ट्रींमध्ये येणारा अडथळा दूर करुन वॉटर एन्ट्री खुल्या करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नाले व गटारे यांच्या प्रवाहावरील अडथळे दूर करण्याचे कामही जलदगतीने करण्यात येत आहे.
बेलापूर से.12 येथील स्ट्रॉम वॉटर पंप हाउुस याठिकाणी पंपींग मशीनची संख्या व क्षमता वाढविण्यात आलेली असून त्याठिकाणी एकूण 1050 हॉर्स पॉवर इतक्या मोठया क्षमतेची अतिरिक्त पंपींग मशीन लावण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पाईप आऊटलेट व्यवस्था व फ्लॅप गेट्स व्यवस्था यांचीही क्षमता वाढ करण्यात आलेली आहे. त्यासोबतच पॉवर बॅकअपसाठी त्याठिकाणी स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai