Breaking News
इंडीगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज यांच्यात करार
नवी मुंबई ः सिडको महामंडळ आणि अदानी उद्योग समुहाच्या सहकार्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. लवकरच येथून पहिल्या टप्यात व्यावसायिक उड्डाणे सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. इंडीगो कंपनी आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यात उड्डाणा संदर्भात नुकताच पहिला करार करण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळ लवकरच विमानाच्या उड्डाणसाठी सज्ज होणार असल्याची माहिती करारानंतर देण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या विमानतळावर भारतीत लढावू विमानांची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. इंडीगो कंपनी आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यात उड्डाणा संदर्भात नुकताच पहिला करार करण्यात आला आहे. या पहिल्या टप्प्यात व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारी इंडिगो ही पहिली एअरलाईन कंपनी असेल, असं एअरलाइन आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) यांनी बुधवारी संयुक्त निवेदनात सांगितले. इंडीगो नवी मुंबई विमानतळावरून 15 हून अधिक शहरांसाठी दररोज 18 उड्डाणे घेतली जाणार आहेत. नोव्हेंबर 2025 पर्यंत 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह 79 दैनिक उड्डाणे आणि नोव्हेंबर 2026 पर्यंत 30 आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह 140 दैनिक उड्डाणे करण्याची कंपनीची योजना आहे.
इंडिगोच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाच्या धाव पट्टीवरुन पहिली विमानसेवा सुरु होणार आहे. याचा आम्हांला आनंद होत असून प्रवाशांच्या वाढत्या गरजा त्याबरोबरच भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला इंडीगो आंतरराष्ट्रीय स्तरावर अधीक गतीमान करणार आहे. - पीटर एल्बर्स, सीईओ, इंडिगो
इंडिगोसोबत अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने (एएएचएल) भागीदारी करीत विमानसेवेसाठी करार करुन यशस्वी पाऊल टाकले आहे. नवी मुंबई विमानतळाला एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आम्ही गाठला आहे. - अरुण बन्सल, सीईओ, एएएचएल
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai