Breaking News
नवी मुंबई ः पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापालिका सातत्याने विविध वृक्षसंवर्धन कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. त्या अनुषंगाने 5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी जाहीर केलेल्या ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचे निर्मूलन’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.
या महत्वाच्या दिनाचे औचित्य साधून आपल्या शाश्वत भविष्यासाठी नवी मुंबई मधील शासकीय/निमशासकीय/अशासकीय कर्मचारी/सुजाण नागरिक/व्यापारी/युवक युवती/विद्याथ/सामाजिक सेवाभावी संस्था/महिला बचत गट/ज्येष्ठ नागरिक आदी व्यक्ती/संस्था यांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे. या अंतर्गत वृक्षरोपणाकरिता रोपांची आवश्यकता असल्यास ती वृक्षरोपे नवी मुंबई पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालयात उद्यान सहाय्यक समन्वयाची भूमिका बजावणार असून नागरिकांनी वृक्षारोपणाकरिता वृक्षरोपे उपलब्ध होण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai