Breaking News
नवी मुंबई ः सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये कोव्हीड -19 संसगत रुग्ण आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोव्हीड - 19 पूर्वतयारीच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे आणि इतर वैद्यकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन कोव्हीड - 19 संसर्गाच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या व सज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
त्यामध्ये कोव्हीड - 19 चाचणी - करणे, पुरेशा प्रमाणात औषधे, सर्जिकल साहित्य, पीपीई किट, ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून घेणेच्या दृष्टीने कार्यवाही करणे, रुग्णालय स्तरावर आवश्यक कक्ष स्थापन करणे, बेड्स उपलब्ध करून देणे अशी अनुषांगिक पूर्वतयारी तातडीने करून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना तत्पर राहणेबाबत निर्देशित करून त्याबाबतची जबाबदारी सर्व संबधितांस देण्यात याव्यात असे सूचित केले आहे. कोव्हिड 19 च्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेणेबाबत नागरिकांमध्येही विविध माध्यमांतून जागरूकता निर्माण करण्याची कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने तत्पर कार्यवाहीस सुरूवात केलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हिडबाबत आवश्यक दक्षता घेण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता व्यक्तिगत स्वच्छतेविषयी काळजी घ्यावी व नाहक भीतीचे वातावरण पसरवू नये. मात्र सद, खोकला, फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा तसेच वैद्यकिय सल्ला घ्यावा आणि आपल्या नजिकच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai