Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिका सेवेतून मे महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या 31 अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांचा सेवानिवृत्ती समारंभ महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सेवानिवृत्तीनंतर आपल्या कुटुंबियांना वेळ द्या. एकटे राहू नका. चांगल्या मित्रांच्या संपर्कात रहा असा मित्रत्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंदाला शुभेच्छा देताना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी महानगरपालिकेच्या आजवरच्या नावलौकिकात आपण सर्वांनी केलेल्या चांगल्या कामाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. यापुढे झपाट्याने काळ बदलत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यालयीन कामकाजात वापर करून नागरिकांची कामे अधिक सुलभपणे होण्याकडे व त्यासाठी ऑनलाईन सेवा सुविधा पूतकडे विशेष लक्ष देण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी सज्ज असायला हवे असे मत मांडले. अत्यंत दिलखुलास संवाद साधताना त्यांनी कार्यालयातील बॉसचे व कर्मचाऱ्यांचे प्रकार सांगून यात आपण नेमके कोणत्या कॅटेगरीत आहोत याचा उपस्थितांना विचार करायला भाग पाडले व अंतर्मुख केले. सेवानिवृत्तीनंतर आपल्या कुटुंबियांना वेळ द्या. एकटे राहू नका. चांगल्या मित्रांच्या संपर्कात रहा असा मित्रत्वाचा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी उपआयुक्त शरद पवार व डॉ.कैलास गायकवाड, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनीही शब्दसुमनांतून शुभेच्छा दिल्या. यावेळी परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, भांडार विभाग उपआयुक्त शंकर खाडे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहा. आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, शिक्षणाधिकारी अरूणा यादव व्यासपीठावर उपस्थित होते.
मे 2025 मध्ये सेवानिवृत्त होणारे अतिरिक्त शहर अभियंता संजय खताळ, कार्यकारी अभियंता मनोहर सोनवणे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.जया श्रीनिवासन, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा राठोड, लेखा अधिकारी शरद पाटील व रमाकांत पाटील, मुख्याध्यापक जगदीश टोले, मनोहर घरत, विकास नाईक, प्राथमिक शिक्षिका सुनंदा म्हात्रे, उषा धुमाळ, शुभांगी संसारे, मंजुषा सावंत, वंदना आतवणकर, सहा.अग्निशमन केंद्र अधिकारी विकास कोळी, औषध निर्माता चारूलता चौधरी, अनघा जावडेकर, मिश्रक/औषध निर्माता सुहास देशमुख, स्वच्छता अधिकारी संजीव शेकडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शत्रुघ्न ढगे व प्रगती साळवे, ऑक्झिलरी नर्स / मिडवाईफ शलाका झरकर, वरिष्ठ लिपिक कमलाकर पाटील, आरोग्य सहाय्यक (महिला) सरोज शिरसाट, लिपिक टंकलेखक अनंत म्हात्रे, वाहनचालक गणेश गोंधळी, नितीन देशमुख, संभाजी दोंदे, कक्षसेवक सुहास म्हात्रे, स्मशानभूमी रक्षक संतोष शिंदे, आया पुजा पाटील अशा 31 अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदासह सेवानिवृत्तांचे कुटुंबियही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai