Breaking News
मुंबई : भारतातील आघाडीची ओम्निचॅनेल फॉरेक्स सेवा कंपनी थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडने त्यांच्या बॉर्डरलेस ट्रॅव्हल कार्ड आणि स्टडी बडी कार्ड यांचा विस्तार करण्यासाठी, भारतातील सर्वात मोठ्या वित्तीय सेवा समूहांपैकी एक असलेल्या मुथूट ग्रुपच्या परकीय चलन विभाग, मुथूट फॉरेक्ससोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.
भारतातील परदेशात सहलीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक स्मार्ट, सुरक्षित आणि सोयीस्कर उपाय म्हणून बॉर्डरलेस ट्रॅव्हल कार्ड आणि स्टडी बडी कार्ड (विशेषतः परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेले)यांचा लवकरच विस्तार होणार आहे. थॉमस कुक (इंडिया) आणि मुथूट ग्रुपच्या यांच्या भागीदारीद्वारे, दोन्ही प्रीपेड फॉरेक्स कार्ड आता मुथूटच्या 7,000+ शाखांच्या विस्तृत नेटवर्कमध्ये उपलब्ध असतील, ज्यामध्ये भारतातील महानगरे, लघु-महानगरे आणि टियर 2-4 टियर सोर्स मार्केटांमध्ये 43 पूर्ण-विकसित फॉरेक्स शाखांचा समावेश आहे.
दिपेश वर्मा,एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट, फॉरेन एक्सचेंज, थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड म्हणाले, “थॉमस कुक इंडियामध्ये, आम्ही आमच्या फॉरेक्स कार्ड सोल्यूशन्सना आमच्या ग्राहकांसाठी सुलभ, अखंड आणि फायदेशीर बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. द मुथूट ग्रुपशी हातमिळवणी करून, आम्ही प्रवास आणि फॉरेक्समधील आमची तज्ज्ञता भारतातील टियर 2-4 टियर सोर्स मार्केटमधील मुथूटच्या विस्तृत नेटवर्कशी जोडत आहोत. या भागीदारीद्वारे, आम्ही आमचे बॉर्डरलेस ट्रॅव्हल आणि स्टडी बडी कार्ड भारतातील महानगरे आणि प्रादेशिक मार्केटांनमधील ग्राहकांच्या जवळ आणण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास आणि परदेशात अभ्यास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होईल.“
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai