Breaking News
तीव्र विरोधानंतर काम थांबवले
नवी मुंबई : नेरुळ येथील लोटस संरक्षित पाणथळ तलावाचे संवर्धन करण्याचे आदेश असतान हा तलाव भराव टाकून बुजवून टाकण्याचा घाट सिडकोने घातला आहे. मात्र पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींच्या कठोर निषेध आणि विरोधानंतर गुरुवारी अखेर लोटस तलावातील भरावाचे काम थांबले. ठेकेदारांनी भराव करण्यासाठी आणलेले पोकलेन यंत्र तसेच इतर वाहने माघारी नेली. पर्यावरणाची हानी करण्यास कारणीभुत असणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
नेरूळ येथील लोटस तलाव नवी मुंबईतील आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. लोटस तलाव हा परदेशी पाहुणे म्हणजेच फ्लेमिंगोच्या वास्तव्याचे ठिकाण आहे. हा तलाव पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करुन त्याचे संवर्धन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने यापुवच दिले आहेत. तरीही त्यात भराव टाकून तो बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव सिडकोने आखला असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. या लोटस तलावात सिडकोने भराव टाकण्याची परवानगी मे. ठाकूर इन्फ्रा (टीआयपीएल) या ठेकेदार कंपनीला दिली होती.
सोमवारपासून या तलावात भराव टाकण्याचे काम सुरु होते. पालिकेने हे काम थांबवण्याचे आदेश दिले मात्र तरीही दोन दिवस पर्यावरणप्रेमी, नागरिक, स्थानिक नगरसेवक यांच्या विरोधाला न जुमानता ठेकेदाराने भराव करण्याचे काम सुरू ठेवले होते. टीआयपीएल कंपनीने लोटस तलावात जवळजवळ 100 डंपर भराव टाकला आहे. बुधवारी लोकप्रतिनिधी व पर्यावरणप्रेमी यांच्या तीव्र विरोधामुळे अखेर भरावाचे काम थांबवले आहे. उच्च न्यायालयाने लोटस संरक्षित पाणथळ तलावाचे संवर्धन करण्याचे आदेशित केलेले असताना लोटस तलाव बुजवण्याचा सिडकोचा प्रयत्न होता, परंतु तो सफल झाला नाही. लोटस तलाव संरक्षित करण्यासाठीचा अंतिम निर्णय झालेला नसल्याने हा पाणथळ तलाव वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवणार असल्याचा विश्वास नागरीकांनी व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai