Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेच्या सहभागातून नेरुळ येथील सीवूड मॉल जवळील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात नवीन ई व्ही चार्जींग स्टेशन हे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवार, 05 जून 2025 रोजीपासून जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. ही सुविधा नवी मुंबईकरांसाठी पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. ही सेवा सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे इलेक्ट्रीक वाहनधारकांना शहराच्या मध्यवत ठिकाणी चार्जिंगची सोपी व सुरक्षित सुविधा पुरविणे हा आहे. जेणेकरून हरित व प्रदूषणमुक्त नवी मुंबई घडविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल.
नवी मुंबईतील या पहिल्या सार्वजनिक ई व्ही चार्जिंग स्टेशनमुळे, शहरात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, आणि पर्यावरण रक्षणास चालना मिळेल असा विश्वास नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने सर्व इलेक्ट्रीक वाहन धारकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे.
चार्जींग स्टेशनमधील सुविधा:
1) दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी चार्जिंग सुविधा
2) दोन गन फास्टर चार्जर (2 30)
3) मोबाईल ॲपद्वारे चार्जिंगसाठी आगाऊ बुकींग सुविधा
4) सार्वजनिक वापरासाठी 247 सेवा उपलब्ध
5) सुरक्षित आणि प्रशस्त पार्किंगची सुविधा
6) आधुनिक आग प्रतिबंधक उपाययोजना
7) विश्रांतीसाठी शांत परिसर व खेळाचे मैदान
8) परवडणारे दर आणि सोयीस्कर वापर
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai