Breaking News
नवी मुंबई : एका व्यक्तीने पहाटेच्या वेळेस एका उड्डाणपुलाखाली झोपलेल्या एका 65 वषय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. मात्र या गोंधळात आसपासच्या लोकांनी दगड डोक्यात घालणाऱ्या व्यक्तीला पकडून बेदम चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन संशयिताला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अभिषेक पाल उर्फ अभिषेक रुद्रप्रताप सिंग असे यातील संशयित आरोपीचे नाव आहे. तर प्रकाश लोखंडे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश लोखंडे हे मूळ अकोला जिल्ह्यातील असून मिळेल ते काम करून गुजराण करतात. शहाबाज गावात त्यांचे नातेवाईक राहत असून तेथे त्यांचे येणेजाणे असते. ते रात्री शहाबाज गावात असणाऱ्या उड्डाणपुलाखाली झोपतात. या ठिकाणी अन्य काही लोकही आसरा घेतात. शनिवारी रात्री नेहमी प्रमाणे लोखंडे उड्डाणपुलाखाली झोपले असता, रविवारी पहाटे साडेतीन चारच्या सुमारास अभिषेक पाल हा त्या ठिकाणी आला. त्याने लोखंडे जेथे झोपले तेथे गेला. तेथेच पडलेला एक मोठा दगड घेऊन त्याने लोखंडे यांच्या डोक्यात दगड घातला. यातच त्यांचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेत आसपासचे लोक जागे झाले. त्यांनी अभिषेक याला पकडून बेदम मारहाण केली. या गोंधळाने शहाबाज गावातील लोकही जागे होऊन येथे आले. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच सीबीडी पोलिसांचे पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी अभिषेक याला ताब्यात घेतले. तो जबर जखमी असल्याने त्याला वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल््यानुसार त्याला मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल केले आहे. संशयित आरोपी अद्याप अटक नाही. तो एपीएमसी येथे राहतो एवढीच माहिती समोर आली आहे. त्याने लोखंडे यांना ठार का मारले हे त्याची चौकशी केल्यावरच समोर येईल. अभिषेक याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai