Breaking News
नवी मुंबई ः 1.25 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून नागरिकांच्या व्यापक सहभागातून नवी मुंबई पालिका उद्यान विभागाने सर्व विभागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून पालिका मुख्यालय आवारात सुरंगी वृक्षरोपांची लागवड करम्ात आली.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्याने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात येत असून अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सुरंगी या सुगंधी फुलझाडाच्या वृक्षरोपाची लागवड करण्यात आली. यावेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उद्यान विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांनीही सुरंगी वृक्षारोपाची लागवड केली.
चार पाकळ्यांची दिसायला अतिशय सुंदर असणारी सुरंगी वृक्षाची फुले आसमंत सुगंधाने भारून टाकतात. या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारे सुरंगीचे झाड त्याची फुले केसातील गजऱ्यात माळण्यासाठी उपयोगात आणली जातात तसेच दीर्घ काळ सुगंध टिकत असल्याने सौंदर्य प्रसाधनांमध्येही याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. महाराष्ट्र शासनाने यावषच्या वृक्षारोपणामध्ये सुरंगी वृक्षांची लागवड करावी असे नमूद केलेले आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व इतर विभागप्रमुख यांच्या हस्ते सुरंगी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. तसेच पालिकेकडून नागरिकांना मोफत वृक्षरोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai