Breaking News
नवी मुंबई ः ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील ठाणे-बेलापूर रस्त्यावर एका टेम्पोमधून चायनीज हॉटेल चालवणाऱ्या गाडीत सिलिंडरचा स्फोट झाला. यात जीवित हानी झाली नाही. मात्र अनधिकृत फेरीवाले स्टॉलधारकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून बुधवारी उशिरापर्यंत कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, बेलापुर, नेरुळ, सानपाडा या सर्वच ठिकाणी सायंकाळी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर गाड्या लावून अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्रि केले जातात. पालिका, पोलीस यांनी कारवाई केल्यानंतर काही दिवसात पुन्हा ये रे माझ्या मागल्या चित्र दिसते. या व्यावसायिकांवर ठोस कारवाई होत नसल्याने ते पुन्हा सक्रिय होतात. या गाड्यांमध्ये तसचे पदथांवर असणाऱ्या स्टॉलवालल्यांकडून खुलेआम सिलेंडर वापरुन खाद्यपदार्थ बनवले जातात. यामुळे पादचाऱ्यांच्याही जिवाला धोका निर्माण होता. ऐरोलीत अशाच एका टेम्पोसारख्या गाडीत चायनिक पदार्थ विक्री सुरू होती. मंगळवारी रात्री साडेआठ नऊच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर प्रशासन योग्य ती पावले उचलून अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करुन अशा घटनांना आळा घालेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल, पोलीस व वाहतूक पोलिसांचे कर्मचारी तात्काळ पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यात काही वेळातच यश आले. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे बेजबाबदार व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला जाईल, अशी माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai