Breaking News
नवी मुंबई ः पावसाळी कालावधीत स्वच्छतेवर अधिक लक्ष देत नवी मुंबई शहरातून जाणारा तथापी नवी मुंबई पालिकेच्या अखत्यारित नसलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा सायन पनवेल महामार्ग स्वच्छ राखण्याकडे आयुक्तांच्या निर्देशानुसार विशेष लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने रविवार 15 जून व सोमवार 16 जून अशा सलग दोन दिवशी सायन पनवेल महामार्गावर नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वाशी टोल नाका ते बेलापूर खिंड अशा नवी मुंबई पालिका हद्दीतील सायन पनवेल माहामार्गाची सखोल स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता मोहीममध्ये वाशी विभागाचे सहा.आयुक्त सुखदेव येडवे, नेरुळ विभागाचे सहा.आयुक्त जयंत जावडेकर, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या निरीक्षणाखाली स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ, अरुण पाटील व नरेश अंधेर या स्वच्छता अधिकाऱ्यांनी स्वच्छता निरीक्षक व उप स्वच्छता निरीक्षक यांच्या सहयोगाने स्वच्छता मित्रांच्या मदतीने आपापल्या क्षेत्रातील महामार्ग स्वच्छतेची जबाबदारी नेटकेपणाने पार पाडली. परिमंडळ 2 मध्येही घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली-मुलूंड खाडी पूल व सर्व्हिस रस्त्याची सखोल स्वच्छता करुन घेण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai