Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने पहिल्या तिमाहीमध्ये मालमत्ताकराच्या सामान्य करावर 10 टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. मालमत्ता धारकांना वेळमध्ये कराचा भरणा करता यावा यादृष्टीने विभागाने ऑनलाईन सुविधासुध्दा सुरू केली आहे. ज्या नागरिकांना कॅश काऊंटर्समध्ये जाऊन कराचा भरणा करावयाचा आहे अशा मालमत्ता धारक नागरिकांच्या सोयीसाठी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा कर भरणा काऊंटर्स सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने पहिल्या तिमाहीमध्ये मालमत्ताकराच्या सामान्य करावर 10 टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. मालमत्ता धारक महापालिकेची वेबसाईट तसेच ॲपवरून तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डवरून अथवा जीपे, फोन पे, पेटीएम अशा विविध यूपीआय सुविधांव्दारे आपला मालमत्ताकर घरबसल्या अगदी सहजपणे ऑनालाईन भरू शकतात. त्यासोबतच ज्या नागरिकांना कॅश काऊंटर्समध्ये जाऊन कराचा भरणा करावयाचा आहे अशा मालमत्ता धारक नागरिकांच्या सोयीसाठी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा कर भरणा काऊंटर्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याप्रमाणेच येत्या शनिवार दि. 21 व रविवार दि. 22 जून आणि पुढील आठवड्यातील शनिवार 28 जून व रविवार दि. 29 जून 2025 रोजी, सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत मालमत्ताकर भरणा काऊंटर्स सुरू राहणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai