Breaking News
नवी मुंबई : सानपाडा गावातील ग्रामस्थांना तलावासाठी गावालगच जागा आरक्षित करुन देखील या ठिकाणी तलाव उभारले जात नाही. सानपाडा ग्रामस्थांतर्फे तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार पाठपुरावा करुनही त्याकडे दुर्लक्ष होत केले जाते. मात्र प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सानपाडा ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन 23 जून रोजी पोकलेनच्या सहाय्याने कृत्रिम तलाव निर्माण केला.
गेल्या अनेक वर्षापासून सानपाडा ग्रामस्थ श्री मूत विसर्जनासाठी टीटीसी इंडेस्ट्रियल भागात तुर्भे पोलीस ठाणेच्या मागे असलेल्या खोडक तलावात विसर्जनासाठी मुंबई-पुणे महामार्ग आणि ठाणे-पुणे महामार्ग ओलांडून धोवयाचा प्रवास करतात. त्यामुळे सानपाडा गावालगत असलेल्या रेल्वेच्या अंडरपास जवळील जुन्याधारण तलावाच्या ठिकाणी नवीन तलावाची उभारणी करण्याची मागणी सानपाडा ग्रामस्थ सातत्याने नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाकडे करीत आहेत. यासाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील संबंधितांकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्यात आलेला आहे. शिवाय महापालिका सर्वसाधारभण सभेमध्ये सानपाडा अंडरपास जवळील जुन्या धारण तलावाच्या ठिकाणी नव्याने तलाव निर्मिती करण्याचा ठराव देखील मंजूर झालेला आहे. त्यानुसार सदर ठिकाणचा भूखंड तलाव आणि मैदान या प्रयोजनासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सिडकोकडे पत्रव्यवहार करुन सानपाडा अंडरपास जवळील मोकळा भूखंड नवी मुंबई महापालिकाकडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली आहे.
आता पावसाळा सुरु झाल्याने मागणी केलेल्या तलावाचे काम प्रशासनाने हाती घ्यावे यासाठी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन 23 जून रोजी कृत्रिम तलाव खोदण्याचे सूचित केले होते. त्यानुसार 23 जून रोजी सानपाडाचे माजी नगरसेवक बाळाराम पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली आणि नंतर पोकलेनच्या सहाय्याने कृत्रिम तलावाचे खोदकाम करण्यात आले. यावेळी सानपाडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai