Breaking News
इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञानावर मार्गदर्शन
नवी मुंबई : नेरुळ येथील एसआयईएस ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नुकतेच इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग ट्रेंड्स इन इंडस्ट्री 4.0 टेक्नॉलॉजीज ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. शैक्षणिक, संशोधन व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी या परिषदेच्या विविध सत्रांमध्ये सहभाग घेतला.
परिषदेचा उद्घाटन समारंभ सी-डॅक मुंबईचे कार्यकारी संचालक डॉ.ससिकुमार एम. यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. डॉ.ससिकुमार यांनी भारतातील डिजिटलीकरणाची प्रगती आणि इंडस्ट्री 4.0 च्या संधींबाबत माहिती दिली. सॉफ्ट लिंक ग्लोबलचे वरिष्ठ संचालक अरुण अशर हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. एसआयईएसचे उपाध्यक्ष एम.व्ही.रामनारायण यांनी शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या बदलांवर सखोल भाष्य केले.
परिषदेच्या प्राचार्या डॉ.लक्ष्मीसुधा यांनी संस्थेच्या संशोधन क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला. परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रीती हेमनानी यांनी परिषदेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि अपेक्षित परिणाम यांची माहिती देताना नवकल्पना, संशोधन व उद्योग क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. या परिषदेत 100 हून अधिक शोधनिबंध विविध तांत्रिक सत्रे, कार्यशाळा आणि पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai