Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबईचा सीईपीआय स्कोअर 53.59 इतका नोंदवला गेला असून तो 60 च्या खाली आहे. त्यामुळे हा भाग ‘गंभीर प्रदूषित क्षेत्र’ म्हणून गणला जाणार नाही. हा निर्णय एसईएसी-2 च्या 241 व्या बैठकीत घेण्यात आला असून, यामुळे नवी मुंबईमधील सर्व पर्यावरण मंजुरी अर्ज आता राज्यस्तरीय पर्यावरणीय मूल्यांकन प्राधिकरण मार्फतच निकाली काढले जाणार आहेत. केंद्रीय स्तरावरील ईएसीकडे अर्ज पाठवण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
सप्टेंबर 2022 मध्ये, राष्ट्रीय हरित लवादने एक निर्णय दिला होता की, प्रकल्पांतील “पोडियम लेव्हल“वर असलेली उघडी जागा वैध मानली जाणार नाही. या आदेशामुळे सीईआयएए ने नवी मुंबईमधील अनेक प्रकल्पांचे पर्यावरण मंजुरी अर्ज स्थगित ठेवले. या अडथळ्यांमुळे अनेक बांधकाम व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि बुकिंग केलेल्या ग्राहकांचे नुकसान झाले. या निर्णयाविरोधात छअठएऊउज थशीीं ऋेपवरींळेप ने जानेवारी 2023 मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने निर्णय सीईआयएए च्या बाजूने दिला होता आणि अर्जावर गुणात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. मात्र मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिली होती. यामुळे प्रक्रिया पुन्हा अनिश्चिततेत गेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर, जून 2025 मध्ये झालेल्या एसईएसी-2 च्या बैठकीत नवी मुंबईचा सीईपीआय स्कोअर 60 च्या खाली असल्याचे स्पष्ट झाल्याने एक निर्णायक टप्पा गाठला गेला आहे. आता सर्व पर्यावरण मंजुरी अर्ज फक्त सीईआयएए मार्फतच निकाली काढले जातील.
बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई यांनी मुंबई उच्च न्यायालय मध्ये दाखल केलेल्या याचिकेच्या निकालात असे म्हटले आहे कि याचिकाकर्त्यांनी पर्यावरण मंजुरीसाठी सादर केलेले प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकाशित केलेल्या नवी मुंबई परिसराच्या सद्यस्थितीतील सीईपीआय स्कोअरच्या आधारावर, कायद्यानुसार विचारात घ्यावेत. हे काम आदेशाच्या प्रकाशनाच्या तारखेपासून आठ आठवड्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नैना बिल्डर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नवी मुंबईतील सर्व विकासकांना आता थेट सीईपीआय कडे पर्यावरण मंजुरीसाठी अर्ज करता येणार आहे. नवी मुंबई विभागाची केंद्रीय मंजुरी प्रक्रियेपासून सुटका झाल्यामुळे प्रकल्पास पर्यावरण परवानगी मंजुरीसाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. रखडलेले प्रकल्प पुन्हा गती घेतील आणि ग्राहकांना वेळेवर घरे मिळण्याची शक्यता वाढेल.
नवी मुंबईचे क्षेत्र क्रिटिकल प्रदूषित नसल्याने यापुढे पर्यावरण मंजुरी विकासकांना जलद मिळणार आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ होवून त्याचा फायदा विकासकांसह ग्राहकांनाही होईल. - प्रकाश बाविस्कर
ही एक स्वागतार्ह आणि डेटा-आधारित सुधारणा आहे. प्रदूषणाचे वगकरण नेहमी अद्ययावत माहितीनुसारच करायला हवे. नवी मुंबईचा स्कोअर कमी झाल्यानंतरही जुने नियम लागू राहणं अन्यायकारक होतं. आता हजारो रोजगार, प्रकल्प आणि घरे यामुळे उभे राहू शकतील. - सुरेश हावरे, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यवसायिक महासंघ
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai