Breaking News
मुंबई : भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने मुंबईतील वाढत्या ऑनलाइन फसवणुकीविरोधात आपल्या मोहिमेत उल्लेखनीय प्रगतीची घोषणा केली आहे. देशभरात एआय वर आधारित फ्रॉड डिटेक्शन सिस्टीम लाँच अंतर्गत एअरटेलने मुंबईत अवघ्या 50 दिवसांत 21 लाखांहून अधिक युजर्सना सफलतेने ऑनलाइन फसवणुकीपासून वाचविले आहे.
ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली सर्व एअरटेल मोबाइल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी ऑटोमॅटिक पद्धतीने ॲक्टिव्हेट होते. ती एसएमएस, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेल आणि इतर ब्राउझर्सरवर पाठविलेली लिंक स्कॅन आणि फिल्टर करते. हे तंत्रज्ञान रिअल-टाइम थ्रेट इंटेलिजन्सचा (सायबर धोक्यांबद्दल त्वरित माहितीचा) वापर करते आणि दररोज 1 अब्जपेक्षा जास्त यूआरएलचे विश्लेषण करते. कोणत्याही धोकादायक साइटवर पोहोचण्यापूर्वी ही सिस्टीम अवघ्या 100 मिलिसेकंदात त्यास ब्लॉक करते.
या प्रणालीमध्ये एखादा ग्राहक सत्य जाणून न घेता आलेल्या लिंकवर क्लिक करते, तर एअरटेलची एआय-सिस्टीम लगेच सक्रिय होते. ती त्या लिंकला स्कॅन करते आणि जर ती संशयास्पद आहे असे आढळले, तर ती त्या साइटला ब्लॉक करते. युजरला एका चेतावणी संदेशावर रीडायरेक्ट केले जाते, ज्यात लिहिलेले असते: “ब्लॉक केले गेले आहे! एअरटेलला ही साइट धोकादायक वाटली आहे!” ही संपूर्ण प्रोसेस रिअल टाइममध्ये, एका क्षणार्धात होते. अशाच प्रकारच्या जलद इंटरसेप्शनमुळे सर्व प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून युजर्सना वाचविले जात आहे. लाँच केल्यानंतर अवघ्या 50 दिवसांमध्येच एअरटेलने देशभरातील 2,03,145 हून अधिक धोकादायक लिंक्स ब्लॉक केल्या आहेत आणि 12.3 करोडपेक्षा अधिक ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित केलेले आहे.
या उपक्रमाबद्दल मत व्यक्त करताना भारती एअरटेलचे मुंबईचे सीईओ आदित्य कांकरिया म्हणाले, एअरटेलमध्ये ग्राहक सुरक्षा आमच्या प्रत्येक कामाच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईत आमचे एआय-संचालित फसवणूक शोधून काढण्याचे समाधान लाँच करून आम्ही आमच्या वापरकर्त्यांना डिजिटल धोक्यांपासून वाचविण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलत आहोत. डिजिटल वापर वाढत जात असताना, आम्हाला शहरातील लाखो वापरकर्त्यांसाठी सुरक्षित, लवचिक आणि विश्वासार्ह डिजिटल इकोसिस्टीम तयार करण्यात अग्रणी भूमिका बजावण्याचा अभिमान वाटत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai