Breaking News
नवी मुंबई ः स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही परस्परपूरक गोष्टींना सामवून घेणाऱ्या ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियानामध्ये नवी मुंबईत संपूर्ण महिनाभरात दररोज विविध उपक्रमांचे नियोजन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून त्यास अनुसरुन धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर गाव येथील पुरातन श्री राम मंदिर परिसराची लोकसहभागातून सखोल स्वच्छता करण्यात आली. नेरुळ विभागात सहा. आयुक्त जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी अरुण पाटील आणि सहकारी अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांच्या सहयोगातून स्थानिक नागरिकांच्या सहभागाने से.20 बालाजी मंदिर परिसरात सखोल स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. वाशी विभागातही सहा. आयुक्त सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ यांच्या माध्यमातून से.8 शिवमंदिर तसेच से.15 बुध्दविहार या धार्मिक स्थळांवर तेथील पदाधिकारी व स्वच्छताप्रेमी नागरिक आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांच्या एकत्रित सहभागातून सखोल स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली.
तुर्भे विभागात सहा. आयुक्त सागर मोरे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या माध्यमातून पुरातन दत्तमंदिर, सानपाडा याठिकाणी आयोजित सखोल स्वच्छता मोहीमेत श्रीदत्त भक्तांनी उत्साहाने सहभागी होत महापालिका कर्मचाऱ्यांसमवेत स्वच्छता मोहीम यशस्वी केली. कोपरखैरणे विभागात पुरातन पावणेश्वर शिवमंदिर पावणेगाव परिसरामध्ये मंदिर समितीचे विश्वस्त अध्यक्ष नंदु पाटील व शारदाई फाउंडेशनचे पदाधिकारी अमित भांडकर व शुभांगी भिकाले यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्वच्छता प्रेमी नागरिकांसह परिसर स्वच्छतेवर भर दिला. सहा. आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी राजुसिंह चौहान यांच्या पुढाकारातून या मोहीमेचे कर्मचारी व स्वच्छता मित्रांच्या सहयोगाने यशस्वी आयोजन करण्यात आले. घणसोली विभागात सावली गाव येथील करणदेवी मंदिर व महादेव मंदिर येथील परिसरात सहा.आयुक्त उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेत से.3, सावली गाव व परिसरातील स्वच्छता प्रेमी नागरिकांनी उत्सहाने सहभागी होत मंदिर परिसर चकाचक केला. ऐरोली विभागातही से.15 येथील इच्छापुर्ती गणेश मंदिर परिसरात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी होत सहा.आयुक्त सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेत हिरीरिने सहभागी होत मोहीम यशस्वी केली.
दिघा विभागाचे सहा.आयुक्त नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी प्रविण थोरात यांच्या नियंत्रणाखाली कन्हैयानगर येथील दुर्गा माता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्रांसह नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत मौलिक योगदान दिले. अशाप्रकारे आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील धार्मिक स्थळांवर ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीमा राबविण्याच्या उपक्रमांमध्ये तेथील पदाधिकारी यांच्या समवेत नागरिकांनीही उत्साही सहभाग घेऊन स्वच्छतेविषयीची आपली आवड आणि आरोग्यविषयीची जागरुकता प्रकट केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai