Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेच्या आस्थापनेवर अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरिता गट ड ची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासन मान्यता लाभली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 उमेदवारांना शिपाई या पदावर अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या दिवंगत कुटूबियांचे वारस म्हणून आपल्याला मिळालेली अनुकंपा तत्वावरील नोकरी, ते सोबत नसण्याचे दु:ख आणि त्यांचे वारस म्हणून मिळालेली संधी अशा संमिश्र भावनेची असून सर्वांना भूषणावह वाटेल असे काम करावे असे मत व्यक्त केले. शिपाई म्हणून रुजू झाला असलात तरी चांगले काम करुन व आपली शैक्षणिक पात्रता उंचावून लिपीक म्हणून बढती मिळेल असे काम करा अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विशाल सुरेश साळुंखे, सुगंधा भरत तातळे, उमेश विठ्ठल मस्तद, प्रशांत जयप्रकाश सुर्वे, आकाश प्रदीप पाटील, सलमान मुस्तफा पिंजारी, आकाश प्रेमनाथ निकम, ज्ञानदेव राजेंद्र भवारी, सौरभ उत्तम चव्हाण, रोनित संतोष नाईक, सुनिता ज्ञानेश्वर पवार, हर्षल विनायक ठोंबरे, मंगला सुरेंद्रसिंग राठोड, हेमंत विष्णु गावित, शुभांगी विनायक पवार, मानसी गणेश सकपाळ, सुनिता जगदीश घरत, मेघा चंद्रकांत नलावडे या 18 जणांना अनुकंपा तत्वावर शिपाई पदाची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
सेवेत असतांना दिवंगत झालेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुंकपा तत्वावर नोकरीत समाविष्ट करुन घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन शासन मान्यतेनुसार देण्यात आलेल्या या नियुक्तीपत्रांबद्दल नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक यांच्यामार्फत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai