Breaking News
नवी मुंबई : व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या वतीने नवी मुंबईत आजपर्यंतची सर्वात मोठी हृदय तपासणी मोहीम राबवण्यात आली. या व्यापक आरोग्य उपक्रमात नवी मुंबई, रायगड, मुंबई, कल्याण, डोंबिवली व आसपासच्या भागांतील 550 हून अधिक प्रौढांची मोफत तपासणी करण्यात आली.
या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांविषयी जनजागृती करणे, तसेच जोखीम असलेल्या रुग्णांचे लवकर निदान व वेळेवर उपचार यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हे होते. हृदयरोग हे भारतात मृत्यूचे एक मुख्य कारण असल्याने, अशा प्रकारची शिबिरे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, असे हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ. अनुज साठे यांनी सांगितले. अशा प्रकारची शिबिरे, हृदयरोगासारखे आजारपण जडलेल्या व्यक्तींची लवकर ओळख पटवण्यास मदत करतात व त्यांच्यावर वेळेवर उपचार होऊन गंभीर गुंतागुंती पासून त्यांचा बचाव करता येतो.
या शिबिरात डॉ. अनुज साठे आणि डॉ. निखिल परचुरे (हृदयरोगतज्ञ), डॉ. विजय डिसिल्वा (इंटेन्सीव्हीस्ट), तसेच डॉ. नितीन गुंद्रे आणि डॉ. अमित जावा (सीव्हीटीएस सर्जन्स) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी व सल्लामसलत करण्यात आली. सामान्य नागरिकांना हृदयविकारांबाबत योग्य माहिती देणे आणि वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे डॉ. निखिल परचुरे यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai