Breaking News
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात 77 ठिकाणी
कोपरखैरणे - धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणाऱ्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे.; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे. गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. त्या ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर गुरुवार, 10 जुलै 2025 या दिवशी कोपरखैरणे येथे संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करत होत्या.
कोपरखैरणे येथे झालेल्या गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा महोत्सवात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सिद्धविद्या म्हणाल्या, सध्या युद्धाची स्थिती आहे. युद्ध हे केवळ तोफ गोळ्यांनी होत नाही, तर आपली कला, साहित्य, संस्कृती यांवर प्रहार करणे हाही एक युद्धाचाच प्रकार आहे. गेल्या अनेक शतकांपासून आपल्या शिक्षण व्यवस्थेला लक्ष्य केले आहे. सतर्क राहून आपला धर्म आणि संस्कृती विरोधी कृतीला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. सनातन संस्थेच्या वतीने यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव कोपरखैरणे, पनवेल आणि उरण यांसह देशभरात 77 ठिकाणी भावपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले.
ठिकठिकाणी झालेल्या महोत्सवांचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. यावेळी स्वरक्षा प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, रणरागिणी, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव: सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. देशविदेशातील हजारो दर्शक आणि हिंदू भाविकांनी याचा लाभ घेतला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai