Breaking News
नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी भिंती, पदपथ यांच्या कॉर्नरवर थुंकण्याच्या नागरिकांच्या सवयींमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्याकडेही व नागरिकांना या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये रेड स्पॉट निर्मूलन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या अभियानामध्ये दररोज वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये विशेषत्वाने रेल्वे स्टेशन परिसर व सार्वजनिक जागी रेड स्पॉट स्वच्छता मोहीमा नागरिकांच्या उत्साही सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आल्या. ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियानाचे पोस्टर्स दाखवून नागरिकांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कुठेही न थुंकण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच तशा प्रकारच्या रेड स्पॉटची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत नेरुळ विभागात बसडेपो ते रेल्वे स्टेशन परिसरातील रेड स्पॉटची पाणी मारून सफाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तुर्भे विभागातही सेक्टर 26 कोपरी परिसर आणि जनता मार्केट परिसरात रेड स्पॉट स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. घणसोली रेल्वे स्टेशन परिसर, रिक्षा स्टँड, पानटपरी याठिकाणी सेक्टर 1 ते 3 परिसरातील रेड स्पॉटवर स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला.
ऐरोली रेल्वे स्टेशन व परिसर 3 याठिकाणी आयोजित केलेल्या रेड स्पॉट स्वच्छता मोहीमेत नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला. रेल्वे स्टेशन्सवरील स्वच्छतेमध्ये सिडकोमार्फत रेल्वे स्टेशन्स सफाईसाठी नियुक्त स्वच्छताकर्मीही सहभागी झाले होते. इतरही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहा.आयुक्त व स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून रेड स्पॉट स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai