Breaking News
मुंबई, दि. 8 :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील दारू तसेच 4 वाहनांसह 40 लाख 64 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक, चरणसिंग राजपूत, उप-अधीक्षक, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डी विभागाकडून 27 ऑक्टोबर 2024 रोजी घोटावडे गावच्या हद्दीत, आंबटवेट रोडवर दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा लावून टाटा कंपनीचे एस गोल्ड या प्रकाराचे चारचाकी वाहन क्र. 12 5122 पकडले. या वाहनामधून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारूचे एकूण 18 बॉक्स (866 सिलबंद बाटल्या) तसेच महाराष्ट्र राज्याचे बनावट लेबल असा एकूण 3 लाख 55 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीस 3 दिवस एक्साईज कोठडी मंजूर केली. पुढील तपासात 4 नोव्हेंबर 2024 रोजी कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ तपासाकामी छापा टाकला असता सदर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे विविध बॅन्डचे विदेशी मद्याचे एकूण 10,000 नग बनावट लेबलसह सापडले आहे. याची एकूण किंमत 88,160 रुपये आहे. या गुन्ह्यातील पुढील तपासात दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवार पेठ, येथून बनावट लेबल छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मशीनसह एकूण 30 लाख 2 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात एकूण 34 लाख 45 हजार 550 रुपयांच्या मुद्देमालासह एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग सचिन श्रीवास्तव, ई विभागाचे निरीक्षक, शैलेश शिंदे, स.दु.नि. स्वप्नील दरेकर, स.दु.नि.सागर धुर्वे, जवान श्री. गजानन सोळंके, जवान श्री. संजय गोरे, यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असून पुढील तपास निरीक्षक, सचिन श्रीवास्तव करीत आहेत.
या विभागाने 1 ऑक्टोबर 2024 पासून आजपर्यंत एकूण 31 गुन्हे नोंद करून 31 आरोपींना अटक करून 4 वाहनांसह एकूण 40 लाख 64 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गावठी दारू 991 लिटर, कच्चे रसायन 1600 लिटर, ताडी 227 लिटर, देशी दारू 33.00 ब. लि., बिअर 255 ब. लि. व परराज्यातील गोवा निर्मित मद्य एकूण 155.88 ब. लि. यांचा समावेश आहे. ही कारवाई विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी, गणपती थोरात, श्रीमती शीतल देशमुख जवान श्रीमती वृषाली भिटे यांनी केली केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai