Breaking News
खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांची सूचना
नवी मुंबई ः रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकासाचे काम उत्तम दर्जाचे व जलदगतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधिकरणाशी समन्वय राखून काम करावे. यासाठी शासनाव्दारे मंजूर झालेला निधी 100 टक्के खर्च होईल यासाठी योग्य नियोजन करावे. अशा सूचना रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केले.
खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दालनात सोमवारी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. रायगड किल्ला संवर्धन व किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी शासनाद्वारे निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानूसार आराखडा तयार करण्यात आला असून आराखडयातील कामांची अंदाजपत्रके तयार करुन निविदा प्रक्रीय पूर्ण झाल्या आहेत. यावेळी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटनाची कामे उत्तम दर्जाची आणि जलद गतीने होण्यासाठी उपसमिती गठीत करण्याच्या सुचना आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदर छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी संबंधितांना दिल्या.
प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) व्दारे आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी विविध ॲप तयार करण्यात येणार आहेत. तसेच व्हिज्यूअल तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यटकांना गड-किल्ले आणि इतिहासातील माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी दालने तयार करण्यात येणार आहेत. याचे प्रारुप स्वरुपाचे सादरीकरण प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) च्या अधिकाऱ्यांदारे याबैठकीत करण्यात आले. या बैठकीत रायगड जलसंधारण विभागाव्दारे रायगड किल्ला, शिवसृष्टी आणि परिसरातील गावांसाठी भविष्यात 30 वर्षे पूरेल या दृष्टीकोनातून पाण्याचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखड्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai