Breaking News
मुंबई ः विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान राज्यभरात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 707 कोटी 43 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यामुळे मतदारांना भुरळ पाडण्यासाठी राजकीय नेत्यांकडून पसरवलेल्या कोट्यावधींच्या मायाजालाचा पर्दाफाश झाला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरपासून राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. कोणत्याही अडथळ्याशिवाय निवडणुका पार पडाव्यात यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. राज्यभरात सी-व्हीजल ॲप द्वारे आलेल्या तक्रारी निवडणुक आयोगाकडून निकाली काढण्यात येत होत्या. निवडणुकीत पैशांचा वापर करून लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम काही असामाजिक तत्व करत असतात. त्यावर चाप लावण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. राज्यात निवडणूक आयोगाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. स्थिर तपासणी पथके आणि भरारी पथकांच्या माध्यमातून छापे टाकून तसेच वाहनांची तपासणीही यादरम्यान करण्यात आली. त्याप्रमाणे आयोगाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात रोकड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. मतदारांना आमिष देण्यासाठी मद्य, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंची वाहतूक होत असताना या बाबी भरारी पथकाने जप्त केलेल्या आहेत.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात 50 हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन जाण्यास परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त रकमेची रोख असल्यास योग्य कागदपत्रे सादर करणे नियमानुसार आवश्यक आहे. ते सिद्ध करण्यास अपयश आल्यास ती रक्कम जप्त केली जाते. विविध अंमलबजावणी यंत्रणांनी बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू असा कोट्यावधींचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये बेकायदा पैसे 162 कोटी 22 लाख 9 हजार जप्त करण्यात आले. तसेच दारु 76 कोटींची, अमंलीपदार्थ 73 कोटींचे, मौल्यवान धातू 284 कोटी आणि इतर वस्तू 111 कोटी असा एकूण 707 कोटी 43 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
विविध अंमलबजावणी यंत्रणांनी बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू असा कोट्यावधींचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये बेकायदा पैसे 162 कोटी 22 लाख 9 हजार जप्त करण्यात आले. तसेच दारु 76 कोटी, अमंलीपदार्थ 73 कोटींचे, मौल्यवान धातू 284 कोटी आणि इतर वस्तू 111 कोटी असा एकूण 707 कोटी 43 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस