Breaking News
नवी मुंबई : संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने एस.एस.सीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन गत 10 वर्षांपासून करण्यात येते. त्यानुसार खेड तालुक्यातील भरणे येथे एस.एस.सी व्याख्यानमाला 2025 चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेला 19 हायस्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होत या व्याख्यानमालेचा लाभ घेतला. या व्याख्यानमालेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राफ्त मॅथ्स मास्टर ट्रेनर कैलास चव्हाण सर, डबल पीएचडी डॉ. संजय मोहिते सर, एम.एस.सी.एम.एड सुभाष जगताप सर या तज्ञ शिक्षकांनी गणित 1 आणि 2, विज्ञान 1 आणि 2 व इंग्रजी या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्वार्था जंगम, जिवक कांबळे यांनी तळे हायस्कूल यांच्यावतीने व संस्कार मर्चंडे व सार्थक मोरे यांनी छत्रपती संभाजी महाराज मिलिटरी स्कूलच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास सीए एम.शट्टी, नवी मुंबई महालिकेचे एमआरओ डॉ. राजेश ओतुरकर, खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्हि. डी. बाईत, उद्योजक उत्तम जैन, पोलिस पाटील महेंद्र खसासे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच उपस्थित सर्व हायस्कूलचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक उपस्थित होते.
सदर कार्पामाचे सूत्रसंचालन बाजीराव चव्हाण, पी.एम.जंगम यांनी केले. तसेच बोरज हायस्कूलचे खडे सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच पांत सपकाळ, रुपेश तांबट, आरती सपकाळ खुशी सपकाळ, साईल सपकाळ आदींसह इतर स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai